‘भाजपकडून लोकशाहीचे वस्त्रहरण’

मुंबई :
भाजपच्या सत्तापिपासू वृत्तीने कळस गाठला असून, काल मुंबईतील रेनिसन्स हॉटेलमध्ये जणू लोकशाहीचे वस्त्रहरणच झाले आहे. असा घणाघात कॉंग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

सध्या कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात मोठी खलबते चालू आहेत. राजकीय घडामोडींचा वेग वाढत आहे. त्यात मुंबईत कर्नाटकचे मंत्री डी.के. शिवकुमार मुंबईत भाजपात प्रवेश करणार्या आमदारांची मने वळवण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना हॉटेलमध्ये साधा प्रवेशही करू दिला नाही. राज्यातील भाजप सरकार एवढ्यावरच थांबले नाही. तर पोलीस दलाचा गैरवापर करून शिवकुमार यांच्यासह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी मंत्री आ. नसीम खान यांना अटक करेपर्यंत त्यांची मजल गेली. आपल्याच पक्षाच्या आमदारांना त्यांना भेटू देण्यात आले नाही. स्वपक्षाच्या आमदारांना भेटण्यात काय गैर आहे? असा सवाल अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*