म्हणून मुंबई मुक्कामी काँग्रेस आमदारांचे बेंगळुरुकडे प्रयाण

मुंबई :

कर्नाटकातील राजकीय गोंधळाला दररोज नवीन वळण मिळत आहे. राजीनामा देऊन अजुनपर्यंत सभापतींनी ते स्विकारले नाहीत. वाट बघून शेवटी या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने आमदारांच्या याचिकेवर सुनावणी करताना आजच संध्याकाळी त्यांना सभापतींसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

शेवटी नाईलाजाने का होईना पण या नाराज आमदारांनी मुंबईतून बेंगळूरूकडे प्रस्थान केले आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांना आपला मुक्काम हलवावा लागला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तातडीने याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट नकार देताना उद्या सुनावणी घेतली जाईल असे स्पष्ट केले. त्यामुळे आमदारांना आज सभापतींसमोर हजर व्हावे लागणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*