विद्यापीठाच्या कार्यक्रमात युवासैनिक-अभाविप कार्यकर्ते भिडले..!

मुंबई :

राजकारणात कोण कोणत्याही क्षणी कोणती भूमिका घेऊन कोणाचा विरोध करेल याचा काहीच भरवसा उरलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात युवा शिवसैनिक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोच धडा पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिला.

मुंवई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी या शैक्षणिक कार्यक्रमात राजकीय रंग देत असल्याचा आरोप करीत अभाविप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यावरून दोन्ही जहाल हिंदुत्ववादी विचारांच्या तरुणांत धुमश्चक्री उडाली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*