‘प्रधानमंत्री रोजगार’मधून ८९ हजार रोजगार

दिल्ली :
‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ (पीएमईजीपी) गेल्या तीन वर्षात देशभरात 13 लाख 82 हजार 440 बेरोजगारांना काम मिळाले आहे तर, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली मध्ये 89 हजार 567 जणांना रोजगार मिळाला आहे.

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणा-या ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ महाराष्ट्र राज्याचा दादरा व नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशासह आणि गुजरात राज्याचा दिव व दमन या केंद्रशासीत प्रदेशासह देशातील 25 राज्य आणि 5 केंद्रशासीत प्रदेशांमध्ये 2016-2017 , 2017-2018 आणि 2018-2019 या तीन वर्षांच्या कालावधीत झालेल्या रोजगार निर्मितीची माहिती सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लिखीत उत्तरात दिली.
महाराष्ट्र, दादरा-नगर हवेलीत 89 हजार 567 रोजगार

महाराष्ट्र व दादरा नगर हवेली मध्ये गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ 65 हजार 872 रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले होते. या योजनेची उत्तम अंमलबजावणी होऊन इच्छित लक्षापेक्षा अधीक म्हणजे 89 हजार 567 एवढी रोजगार निर्मिती झाली आहे. वर्ष 2016-2017 मध्ये 17 हजार 799 , वर्ष 2017-2018 मध्ये 26 हजार 632 तर वर्ष 2018-2019 मध्ये45 हजार 136 रोजगार निर्मिती झाली.

देशात ‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत’ 14 लाख 83 हजार 808 रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले होते. यापैकी 13 लाख 82 हजार 440 एवढी रोजगार निर्मिती झाली आहे. देशात अनुक्रमे वर्ष 2016-2017 मध्ये 4 लाख 7 हजार 840 , वर्ष 2017-2018 मध्ये 3 लाख 87 हजार 184 तर वर्ष 2018-2019 मध्ये 5 लाख 87 हजार 416 रोजगार निर्मिती झाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*