पवार साताऱ्यात, तरीही राजे चंद्रकांत पाटलांच्या भेटीला

सातारा :
सातारा राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष मोठा आहे. लोकसभेत पवारांनी मध्यस्थी केली आणि साताराची जागा राष्ट्रवादीच्या हाती आली. मात्र, हा संघर्ष अधुन मधून उफाळून येत असतो. जावळीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नुकतीच भेट घेतली. शिवेंद्रराजे यांनी घेतलेल्या चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर साताऱ्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अंतर्गत संघर्षाचा परिणाम हा बहुतांश वेळा पक्षबदल असतो कदाचित ही भेट पक्षबदलाची पूर्वतयारी आहे का अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यावेळी साताऱ्यात असताना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. दरम्यान, शरद पवार यांच्या भेटीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसेच बहुतांश आमदार गेले होते.

आमदार भोसले यांची प्रतिक्रिया
आपण कुणावरही नाराज नसून बाहेर गावी असल्याने शरद पवारांना भेटायला जाऊ शकलो नसल्याचे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*