‘गटारीचं झाकण महापौरांच्या तोंडावर ठेवूया’

मुंबई :
मुंबईत वारंवार दुर्दैवी घटना अपघात घडत असतात. रेल्वे पुलाची दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी ना रेल्वे प्रशासन घेते ना महापालिका प्रशासन. अशा अनेक दुर्घटनांची जबाबदारी झटकून सगळे मोकळे होतात. अशा वेळी मुंबईकरांनी आधार म्हणून कुणाकडे पाहायचे. अशा आधारच्या वेळी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जर मुंबईकरांनाच दोषी ठरवत असेल तर काय? सध्या हीच अवस्था मुंबईकरांची झालेली आहे.

गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा लहानगा नाल्यात पडून वाहून गेला आहे. यावर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मुंबईकरांच्या लापरवाहीमुळेचं मुंबईत वारंवार दुर्दैवी घटना घडतात असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावार निशाणा साधला. मुंबईकरांनो, चला जाऊया आणि एखाद काढलेलं झाकण महापौरांच्या तोंडावर ठेवू या, असे आव्हाड यांनी म्हंटले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*