२०२७ मध्ये ‘चिनी कम’; लोकसंख्येच्या बाबतीत भारत असेल चीनच्या पुढे

दिल्ली :
दिवसेंदिवस भारतामधील लोकसंख्या वाढत आहे. ‘हम दो हमारे दो’ यानंतरही लोकसंख्या वाढतंच आहे. संयुक्त राष्ट्रानं जागतिक लोकसंख्येबद्दल भाष्य करणारा अहवाल प्रकाशित केला आहे. सध्या लोकसंख्येच्या बाबतीत चीन प्रथम स्थानी आहे मात्र येत्या दहा वर्षात म्हणजेच २०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकून पहिल्या स्थानावर असेल असा अभ्यास या अहवालाच्या निष्कर्षाअंती काढण्यात आला आहे.

पुढील तीन दशकांमध्ये भारताची लोकसंख्या २७ कोटी ३० लाखांनी वाढेल असेही या अहवालामधे म्हटले आहे. सध्या जगाची लोकसंख्या ७.७ अब्ज इतकी असून २०५० पर्यंत ती ९.७ अब्जांवर जाऊन पोहोचेल, अशी आकडेवारी संयुक्त राष्ट्राच्या अहवालात आहे. पुढील तीन दशकांमध्ये जगाची लोकसंख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल, असा अंदाज यातून वर्तवण्यात आला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*