पार्थ पवार यांच्या गाडीच्या चालकाचे अपहरण

पुणे :
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करण्यात आले आणि त्याला नगरमधील सुपा येथे बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आले. सातपुते यांचा मोबाईलही गहाळ झाला असून त्याने एसटीने सणसवाडी येथे येऊन खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

अपहरणकर्त्यांनी ‘तु पार्थ पवारांचा ड्रायव्हर का?’ असे म्हणत सातपुते याला ओमनी मधे बसवले. आणि त्यापुढे काय झाले ते आठवत नाही असे सातपुतेंचे म्हणने आहे. यानंतर स्वतः पार्थ पवार ह्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. ते पुणे आणि मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*