बंदुका घेऊन नाचणाऱ्या आमदाराची हकालपट्टी

देहरादून :
गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका आमदाराचा हातात बंदुका घेऊन नशेत नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामुळे भाजपाला टिकेचे धनी व्हावे लागले. आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांचा तो व्हिडीओ होता. यामध्ये प्रणव सिंह चॅम्पियन दारुच्या नशेत बंदुका घेऊन डान्स करताना दिसत होते. ते उत्तराखंडचे खानपूर मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत.त्यांच्या या कृत्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

ही पक्षातील निलंबनाची कारवाई शुक्रवारी करण्यात आली. एका पार्टी दरम्यान ‘लांबा लांबा घूंघट काहे को डाला …’ या गाण्यावर प्रणव सिंह चॅम्पियन एका हातात दारुचे ग्लास आणि एका हातात 4-4 बंदुका घेऊन डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने त्यांच्यावर मोठ्याप्रमाण टीका करण्यात येत होती.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*