‘शिवसेनेचा आमदार व्हावा म्हणूनच मोहितेंवर गुन्हा दाखल’

पुणे :
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत ऊमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. कधी खेळाडू वृत्तीचे तर कधी सुडाचे राजकारण करताना ईथे पुढारी दिसत आहेत. खेड तालुक्‍यात राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते निवडून येऊ शकतात, पण शिवसेनेचा उमेदवार निवडून यावा, म्हणून त्यांच्यावर एक वर्षाने खोटा गुन्हा दाखल केला आहे. हे युती सरकारने कुभांड रचले आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, याची कार्यकर्त्यांना कुणकुण लागताच कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल (दि. 11) चाकण येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निषेध नोंदविला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*