सोनाक्षी सिन्हावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई :
बाॅलिवूड का असली सोना, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अशी ओळख असलेल्या सोनाक्षीवर लाखो रुपयांच्या फसवणुकीचा आरोप झाला आहे. याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

‘आजतक’च्या रिपोर्टनुसार गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सोनाक्षीला एका स्टेज शोमध्ये परफॉर्म करायचे होते. त्यासाठी तिने 24 लाखांची रक्कम घेतली होती. मात्र, सोनाक्षी या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली नाही. त्यामुळे मुरादाबादमध्ये पोलीस या केस संदर्भात सोनाक्षी सिन्हाची जबाब नोंदवण्यासाठी मुंबईत आले आहेत. यासाठी सोनाक्षी राहत असलेल्या परिसरातील पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आता मुरादाबाद पोलिस सोनाक्षीच्या जबाबाची वाट पाहतायेत. रिपोर्टनुसार, पोलिसांची टीम पुन्हा एकदा सोनाक्षीला भेटायला जाऊ शकते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*