काँग्रेसची गळती; भाजपाइंची गच्छंती..!

अहमदनगर :

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक आमदार व प्रमुख नेते भाजपवासी होणार असल्याचे सांगून राज्यात रंजक स्थितीवर भाष्य केले आहे. एकूणच सध्या भाजपमध्ये आयाराम जोरात असतानाच अगोदरपासून राजकीय स्वप्न पाहणाऱ्या या पक्ष्याच्या नेत्यांमध्ये गच्छंती होण्याची भीती दाटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यास कसे आवरणार यावर पुढील राजकीय गणित अवलंबून असणार आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव अनेकांना धक्का देणारा ठरला. पराभव स्विकारत अगदी राहुल गांधीपासुन मोठमोठ्या दिग्गजांनी राजीनामे दिले. त्यातही महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षामुळे भाजपवासी झालेले विखेंसारखे तगडे नेतृत्व गेल्याने राज्यातील काँग्रेस खचून गेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील काँग्रेसला मोठे खिंडार पाडण्यासाठी भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत.

काँग्रेसचे अनेक आमदार स्वतःहून भाजपा आणि शिवसेनेच्या संपर्कात असून अनेकांना उमेदवारीसह अन्य आमिषे दाखवून पक्षात येण्यासाठी आमंत्रण दिले जात आहे. काँग्रेसचे किमान पाच आमदार स्वत:हून पक्ष सोडण्याच्या मनःस्थितीत असून आणखी काहीजणांना फोडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक आणि गोव्यातील काँगेसला गळती लागल्याने बेजार झालेल्या पक्षाला महाराष्ट्रातील संभाव्य गळतीची आणखी डोकेदुखी निर्माण झाली आहे.
विधानसभेतही भाजपाची लाट राहिल असे लोकांना वाटत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार भाजपशी संपर्क करत आहेत असे भाजप नेत्यांचे म्हणने आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केला आरोप

भाजपाने देशभर फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. तिकीट देतो आणि पैसेही देतो असे सांगून भाजपकडून आमदार फोडले जात असल्याचा आरोप केला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*