रोहित पवारांच्या गुडघ्याला बाशिंग : चंद्रकांत पाटील

सातारा :

राष्ट्रवादी रोहित पवार यांना उमेदवारी देऊन पवार कुटुंबातील घराणेशाही वाढवीत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजपा कार्यकर्ते आणि पुढारी घराणेशाही वर नेहमीच कडाडून टीका करत असतात. लोकसभेच्यावेळीही हा मुद्दा ऐरणीवर होता. आता शरद पवार यांच्या कुटुंबातील रोहीत पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमधेही हा मुद्दा पुढे केला जाईल हे नक्कीच. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवार कुटूंबातील पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देणार्‍या शरद पवार यांच्या घरातील रोहित पवार आता गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात केवळ पवारांची घराणेशाही चालू असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टिका केली. महाबळेश्‍वर येथील भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आता घराणेशाही हा मुद्दा घेऊन शरद पवार याला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*