चिअर्स..! सर्वात जुनी वाईन सापडली; मदिरेचा विषयचं खोल ना भो..!

पहिल्या धारेची दारू काय असते ते ‘अट्टल’ असणाऱ्या भावांना विचारा… अट्टल म्हणजे त्या विषयात पीएचडी केलेले..!
पहिल्या धारेची दारू आणि सर्वात जुनी दारू याचे महत्व फक्त अट्टल कार्यकर्त्यांना माहित आहे. यात साधारणपणे दोन वर्ग पडतात जे भौगोलिक क्षेत्रानुसार विभागले गेलेत. आता हितं भौगोलिक स्थान रचना क्षेत्र वगैरेचा काय संबंध तर हो संबंध आहे ना भौ. पहिल्या धारेची दारू काय असते हे गावाकडच्या भावांना विचारा आणि सर्वात जुनी दारू काय असते हे शहरातल्या ब्रोंना विचारा..!

लेखक : विनोद सूर्यवंशी (कार्यकारी संपादक, कृषीरंग)

आता टाईमपास न करता मुद्द्यावर येतो. मात्र, आता हे वाचा. जॉर्जिया मधल्या काही शास्त्रज्ञांना तब्बल 8000 हजार वर्षांपूर्वीची जुनी वाईन सापडली आहे. आता ह्या वाईनची किंमत म्हणजे नावेच गौडबंगाल. आपल्या गावाकडचा एखादा माणूस आयुष्यभर दारू पिऊन शेवटी दारूमुळेच गचकला असेल, ती याची किंमत नाही. त्याने आयुष्यभर पिलेल्या दारूचे पैसेही ही बाटलीभर जुनी वाईन घ्यायला कमी पडतील. तर… पुन्हा मुळ विषयावर येऊ.
ते शास्त्रज्ञ काही वाईन शोधायला गेले नव्हते. तर किस्सा असा झाला की, त्या शास्त्रज्ञांला सापडली जुनी मातीची भांडी. त्यांला संशोधनाची सवय… ती भांडी हलवून बघितली. वासामुळं एखादा शास्त्रज्ञ गुगून पडला आसंन त्याच्यामुळे त्यांला पण वाटलं असेल बघावा ब्वाॅ काये त्या मातीच्या भांड्यात? संशोधनाअंती ती वाईन होती असं कळालं.
आणि मग लक्षात आलं की ही सर्वात जुनी वाईन आहे. कारण दारूनिर्मितीसाठी वापरण्यात आलेली 7,000 वर्षं जुनी भांडी इराणमध्ये सापडली होती. यातील सर्वांत जुनं भांडं ख्रिस्तपूर्व 5,980 सालच्या आसपासच्या काळातलं आहे. इराणच्या काही पर्वतरागांमधे ख्रिस्तपूर्व 5,400 ते 5,000 या काळातील वाईन बनवण्याचे पुरावे सापडले आहेत.

हा आतापर्यंतचा वाईन निर्मितीचा सर्वांत जुना पुरावा आहे. त्याच्यामुळं भावांनो आताच दारू साचवा, भविष्यात तुमच्या पुढच्या पिढ्यांसाठी तो सोन्याच्या खाणीपेक्षा मोठ्ठा असेल ना भौ… पुढच्या पिढ्याही म्हणतील आजोबाच्या नावाने चिअर्स ना भाऊ…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*