दिपाली सय्यद यांच्या रूपाने श्रीगोंद्यात पाचपुतेंना आव्हान..!

अहमदनगर :

राजकारणात एकाच निवडणुकीत एकत्र प्रचार करणारे पुढच्या निवडणुकीत एकत्रितपणे विजयासाठी लाधातीलाच याचा काहीच नियम नसतो. सध्या नागर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांमध्ये हाच प्रत्यय मतदार घेत आहेत. त्यापैकीच एका प्रमुख चर्चेतील मतदारसंघ म्हणजे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ होय. यामध्ये सध्या महायुतीच्या भिडूमध्ये जोरादार चुरस रंगली आहे.

नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराजित केले. त्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली ती नगर तालुक्याने. येथील शिवसेनेने भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांवर पक्षाविरोधी काम केल्याचे आरोप करीत मोठे मताधिक्य डॉ. विखे यांना दिले. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजनेवर वाळकी येथील बाजार तळावर ठोस आश्वासन भाजपची बाजू पक्की केली. त्यावेळी डॉ. विखे यांच्या प्रचारात माजी मंत्री बबनराव पाचपुते व अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी नगर व श्रीगोंदा तालुक्यातून मोठ्या मताधीक्यासाठी जीवाचे रान केले. त्यामुळे डॉ. विखे यांना या भागातून मोठी आघाडी मिळाली. मात्र, आता पाचपुते यांच्यासमोर दिपाली सय्यद यांनी आव्हान उभे केले आहे.

खासदार विखे यांच्यावरही आरोप

खासदार डॉ. विखे यांनी साकळाईच्या मुद्यावर विश्वासघात केल्याचा आरोप करीत दिपाली सय्यद यांनी राजकीयदृष्ट्या वेगळी वाट निवडण्याचेही सूचित केले आहे. तसेच गुंडेगाव (ता. नगर) येथून सामाजिक कार्याला जोमाने सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथे शिवसंग्राम पक्षातर्फे साकळाईच्या मुद्यावर मोठा मेळावाही त्यांनी आयोजित केलेला आहे. एकाचवेळी डॉ. विखे यांच्याविरोधात बोलातानाच भाजपचे नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या मतदारसंघात आव्हान देण्याचीही तयारी दिपाली सय्यद यांनी केली आहे. त्यांची ही राजकीय घोडदौड नेमकी कोणाच्या पाठींब्याने सुरू झाली आहे, याबद्दल चर्चाही सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्याविरुद्ध पाचपुते किंवा नागवडे गट अपक्ष लढल्यास (जिल्हा परिषद सभापती अनुराधा नागवडे) श्रीगोंदा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे बोलले जात होते. मात्र, विधानसभा निवडणूक लक्ष्य करीत दिपाली सय्यद यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. यापूर्वी आप या राजकीय पक्षातर्फे दिपाली यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांचा आपला चाहता वर्ग या भागात आहे. तसेच माहिलांचे व साकळाईच्या मुद्यावर तरुणांचे संघटन त्यांच्याकडे आहे. अशावेळी महायुतीचा मित्रपक्ष म्हणून शिवसंग्रामतर्फे भाजपच्या कमळ चिन्हावर त्यांनी लढण्याची तयारी केल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*