यंदाचा अर्थसंकल्प बेहिशोबी; कॉंग्रेसचा आरोप

मुंबई :

यंदाच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सदर केलेली आकडेवारी बेहिशोबी असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसने केला आहे. त्याबद्दल अधिकृतरीत्या ट्विटरवर काँग्रेसने व्हिडिओ शेअर केला आहे.

महाराष्ट्र कॉंग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांनी उत्पन्न आणि खर्चाचे खोटे आकडे सादर करत १ लाख ६५ हजार १७६ कोटींचा हिशोबच दिला नाही. यावर पत्रकार प्रश्न विचारायला गेले असता त्यांना अर्थमंत्रालयात प्रवेशबंदी केली. भाजप सरकार निव्वळ खोट्याच्या आधारावर उभं असून देशाला अक्षरशः बरबाद करतंय! “

कॉंग्रेसच्या या आरोपावर आता भाजप कोणती प्रतिक्रिया देणार, याकडे देशाचे लक्ष लागेल आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*