भाजप सरकारचा नियोजनशून्य कारभार : कॉंग्रेस

मुंबई :

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून सावरत देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने आता पुन्हा एकदा विविध आर्थिक व सामाजिक मुद्यांवर भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप सरकारचा नियोजनशून्य कारभार सुरू असल्याने वाहन उद्योगाचे कंबरडे मोडल्याची टीका महाराष्ट्र कॉंग्रेसने केली आहे.

ट्विटमध्ये कॉंग्रेस पक्षाने म्हटले आहे की, ” सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे लोकांच्या हातात पैसाच राहिला नसून त्याचा प्रतिकूल परिणाम वाहन विक्रीवर होतोय. जनतेची खरेदी क्षमता संपवण्यास भाजप सरकारचा नियोजनशून्य कारभारच जबाबदार असून आज वाहन निर्मिती क्षेत्राचे जे काही नुकसान होत आहे त्याची भरपाई हे भाजप सरकार कशी करणार? “

याबद्दलची इमेज काँग्रेसने टाकली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*