बिझनेसवाला | मोबाईल गॅरेज म्हणजे हक्काचा रोजगार

गाडी चालवायला सर्वांनाच आवडते पण पंक्चर असलेली गाडी चालवायची म्हणजे अंगावर काटाच येतो! त्यातल्या त्यात जर टू व्हीलर असेल तर विचारायचीच सोय नाही.

उन्हातानात महाराष्ट्रतील खराब रस्त्यांवर पंक्चर असलेली गाडी ढकलायला कोणालाही आवडणार नाही. गाडी ढकलत नेणे, गॅरेजला रंगेत लावणे आणि परत पंधरा-वीस मिनिटे थांबणे आजच्या काळात कोणाला आवडेल?

गॅरेज जवळ असेल तर ठीक नाहीतर गाडीचे ट्यूब फाटण्याचा धोका असतो. यामुळे आपल्याला एक पंक्चर साठी बराच आर्थिक तोटा सहन करावा लागतो.

या समस्येवर आपल्याला उपाय शोधून एक नवीन उद्योग संधी निर्माण करायची आहे. आपण जागेवरच पंक्चर काढण्याची सुविधा निर्माण केली तर?
पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांत याचे मॉडेल यशस्वीपणे चालत आहेत.

हा एक कमी भांडवलात सूरू होणारा व्यवसाय आहे. यात आपल्याला पंचर काढण्यासाठी लागणारी सर्व उपकरणे गाडीवर जोडायची आहेत. गाडीची कामे जमत असतील तर तूम्ही करू शकता नाहीतर एक मेकॅनिक ठेवावा लागेल.

हा व्यवसाय चालण्यासाठी तुमचा संपर्क क्रमांक शहराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचणे गरजेचे आहे. घरपोच सेवा असल्याने तुम्ही अधिक चार घेऊ शकता. पंक्चर सोबतच दुचाकी आणि चारचाकीची इतर कामे करण्याची सेवा तूम्हाला देता येतील.

ठाणे, पुणे, औरंगाबाद, नांदेड इत्यादी शहरात प्रत्येकी चार-पाच, तर इतर छोट्या शहारात किंवा मोठ्या गावाच्या परिसरात व महामार्गावर असे एक-दोन फिरते (मोबाईल) गॅरेज चालू शकतात.

लेखक : शेख रियाझ, बिझनेसवाला, लातूर
मो. 7378926295

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*