आला नवा टायर; ना हवा भरण्याचे, ना पंचरचे टेन्शन..!

नव्या शोधामुळे मानवाचे जीवन आणखी सुखकारक होत असतानाच अनेक नव्या समस्याही पुढे येऊ लागल्या आहेत. त्यातील प्रमुख समस्या म्हणजे दुचाकी वा चार चाकी वाहनांचे पंचर. हवा कमी झाल्यावरही चालक व प्रवाशांची हवा गुल करणाऱ्या या प्रकारापासून सुटका मिळाली तर..?

होय, हे पुढील काळात शक्य आहे. अमेरिकन मिचेलीन ही टायर कंपनी आणि जनरल मोटर्स या दर्जेदार गाड्यांच्या निर्मिती व विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीने हवा भरण्याची गरज नसलेला व कधीही पंचर न होणारा विशेष टायर आणला आहे.

ट्यूब व टायर यांच्या अतूट प्रेमाला ट्युबलेस टायरने तोडून टाकले. त्यामुळेच ट्युबलेस टायरला मोठी मागणी आहे. मात्र, यां नव्या टायरच्या पंचर काढण्यासाठी होणारा मोठा खर्च हा भुर्दंड बनला आहे. काहीही खर्च न करता ट्युबलेस टायरने पंचरवाल्यांना अच्छे दिन आणले. मात्र, आता वाहन मालक व चालकांची लवकरच या जाचातूनही सुटका होणार आहे. त्यासाठी मिचेलीन व जनरल मोटर्स यांच्या या टायरची भारतात विक्री होण्याची वाट पहावी लागणार आहे, इतकेच..!

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*