सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात विमानात शेजारी-शेजारी..!

अहमदनगर :

काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष या पदावर निवड झालेल्या बाळासाहेब थोरात व भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा स्थानिक राजकारण व विमानातील शेजार सध्या जोरात ट्रेंडिंग आहे.

गेल्या शतकापर्यंत राजकारणात योगायोग होणं ही गोष्ट शक्य होती. पण आता राजकारणात योगायोग होणे अशक्य. आताच्या काळात प्रत्येक गोष्ट प्री प्लॅनड असते. तशी पिढ्या न पिढ्या राजकीय प्रतिस्पर्धी असणारे दोन मातब्बर नेते विमानात एकत्र दिसले आहेत. एकमेकांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी योगायोगाने दिल्लीला एकाच विमानाने प्रवास केला.

स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही शेजारी शेजारीच जागा मिळाली. अधिवेशनाची सुट्टी संपवून खासदार विखे दिल्लीला निघाले होते. तर थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तेही वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीला निघाले होते. शिर्डी येथे सकाळी १०.३० च्या विमानात ते एकत्र आले होते. आता त्यांच्यात काय चर्चा झाली? कशासंदर्भात झाली याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*