काँग्रेसच्या नेतृत्वावरच काँग्रेसच्याच नेत्यांचे सवाल..!

नवी दिल्ली :

दिल्लीमधे नुकत्याच काँग्रेसच्या गट आणि जिल्हास्तरीय निरीक्षक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यानंतर काँग्रेस मधे पुन्हा भडका उडाला आहे. आता अशी परिस्थिती आहे की काँग्रेस संपवायला काँग्रेसच कारणीभुत ठरेल कारण लोकसभा पराभव, राजीनामा सत्र, यानंतर झालेल्या नव्या नेतृत्व निवडीवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह या सगळ्या गोष्टी काँग्रेसला अडचणीत आणत आहेत. कदाचित काँग्रेस अडचणीत आहे हे पाहून भाजपाचे काम निवांत चालेल. याच शांततेच्या काळात काँग्रेस मोठी तयारी करू शकते. अशीही त्यांची रणनिती असु शकते.

काँग्रेसच्या २४ नेत्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. नुकत्याच काँग्रेसद्वारा गट आणि जिल्हास्तरीय निरीक्षक नियुक्त्या केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष शिला दिक्षीत सध्या रूग्णालयात आहे. तर मग इतके महत्त्वपूर्ण निर्णय कोण घेत आहे? असा सवाल राहुल गांधी यांना केला आहे. पडद्यामागे कोणीतरी प्रदेश काँग्रेस चालवत आहे, अशी शंका काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*