कँसरबाबत जनजागृती महत्वाची : ओमप्रकाश शेटे

अहमदनगर :
महिलामध्ये वाढत चाललेल्या कॅन्सर बाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे असे मत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी हिवरे बाजार येथे काढले.आदर्श गाव हिवर बाजार येथे गर्भाशय मुख कॅन्सर व स्तनांचा कॅन्सर (एच.पी.व्ही.) ह्युमन पापिलोमा व्हायरस याबाबत जनजागृती दक्षता व उपाययोजना या विषयी शिबीर आयोजित केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.

कॅन्सर या आजारावरील दक्षता म्हणून प्राथमिक टप्प्यात हिवरे बाजार, टाकळी खातगाव, भोयरे पठार, दैठणे गुंजाळ, पिंपळगाव वाघा या गावातील ११ ते १४ वयोगटातील मुलीना डोस (vaccination) देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री वैदकीय सहाय्यता कक्ष व कॅन्सर पेशटस एड असोसीएशन मुंबई तसेच ग्रामपंचायत हिवरे बाजार यांच्या संयुक्त विद्यमानाने सी.एस.आर.निधीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.यात पहिला डोस आज देण्यात आला तसेच दुसरा डोस ६ महिन्या नंतर देण्यात येणार आहे.पुढील टप्प्यात १५ ते २६ वायोगटातील मुली तर तिसऱ्या टप्प्यात २६ ते ४५ वायोगटातील महिलांना हा डोस देण्यात येईल.

शेटे पुढे म्हणाले, कॅन्सर या जीवघेण्या आजारा विषयी जनजागृती राळेगणसिद्धी ,हिवरे बाजार या गावातून होणे हि आनंदाची बाब आहे. या शिबिरासाठी उपस्थित मुलींची संख्या ,त्यांच्याबरोबर आलेले पालक त्यासाठी पोपटराव पवार व सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली स्थानिक पातळीवर केलेली जनजागृती आनंददायी आहे. श्री.पवार व हिवरे बाजार परिवार प्रत्येक कारणाच्या मुळाशी जाऊन त्याचे समूळ उच्चाटन करायचे हे कौतुकास्पद आहे.

यावेळी कॅन्सर पेशटस एड असोसीएशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. धनंजया सारनाथ म्हणाल्या की, या देशात महिला मधील गर्भाशय मुख व स्तन कॅन्सर चे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत आहे हि भविष्यासाठी चिंतेची बाब आहे.त्यासाठी सर्व शासकीय ,राजकीय व सामाजिक पातळीवर प्राथमिक स्तर वर चाचणी योग्य निदान करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.त्यासाठी मुली व पालका मध्ये या आजारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी व वेळीच प्रतिबंध करावा.ऑस्ट्रलिया ,इटली ,स्वीडन ,नेदरलैड, इथोपिया, झेकोस्लावीया या अशा अनेक देश या आजारावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाली आहेत.तेथील सरकार जनजागृती ,प्राथमिक स्तरावरील चाचणी योग्य निदान व उपाययोजना यावरील सर्व खर्च शासकीय पातळीवर केला जातो.आपल्या देशात सामान्य कुटुंबाना एवढा खर्च करणे शक्य नाही.त्यासाठी स्वयसेवी संस्था ,शासन व सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातून सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे समूळ उच्चाटन करणे शक्य होईल.

यावेळी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी कॅन्सर वरील निदान व उपचार यामागचा हेतू उपस्थित मुलीना व पालकांना समजून सांगितला. स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी व जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास डॉ.राजेश सोनार (समन्वयक राष्ट्रीय बालस्वस्थ्य कार्यक्रम, पुणे), संदेशजी कार्ले (जि.प.सदस्य), रामदास भोर (सभापती प.समिती नगर), डॉ. ज्योती मांडगे (तालुका आरोग्य अधिकारी), डॉ. व्ही. के. काकडे (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, टाकळी खातगाव), डॉ. निलेश कोल्हे (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, टाकळी खातगाव) ,डॉ. दत्तात्रय शिंदे ­(आरोग्यसेवक) व इतर कर्मचारी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*