महिला बचत गटासाठी 17 जुलैला प्रशिक्षण

अहमदनगर :
महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगामार्फत महिला बचत गटातील महिलांची कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक ज्ञानाबाबत जनजागृती करण्‍या‍करिता प्रशिक्षण देण्‍यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्‍ये महिलांना कायद्याविषयक व विविध योजनांची माहिती देण्‍यात येणार आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा विजया रहाटकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील महिला बचत गटासाठी दिनांक 17 जुलै 2019 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यत माऊली संकुल सांस्‍कृतिक हॉल, सावेडी, अहमदनगर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. महानगरपालिका हद्दीतील सर्व महिला बचत गटांनी प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्‍त श्रीकृष्‍ण भालसिंग यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*