भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची माळ चंद्रकांत पाटीलांच्या गळात

दिल्ली :

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रीपद मिळल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. यामधे चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राम शिंदे हि नावे चर्चेत होती. काल राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

लोढा आणि खा. मनोज कोटक यांच्यापैकी एकाला मुंबई अध्यक्ष पद मिळणार होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या नियुक्त्या केल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी मंगळवारी अधिकृत पत्रकाद्वारे दिली. सोबतच उत्तर प्रदेशचाही नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*