‘एक आमदार फुटला, तर पक्ष संपत नाही’

ठाणे :
आमदार पांडुरंग बरोरा यांनी हातातील घड्याळाला सुट्टी देत शिवबंधंन हाती बांधले. यानंतर तेथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थिती ढासळली आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की ‘एक आमदार फुटला, तर पक्ष संपत नाही, कार्यकर्त्यांनी नव्याने तयार करून येत्या विधानसभेत शहापूरमध्ये राष्ट्रवादीचाच आमदार निवडून आणा’.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्हीमधील आमदार भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. अशा वेळी पवारांनी एक आमदार फुटला तर पक्ष संपत नाही असे म्हणले असतील तरी राष्ट्रवादी मधील बर्याच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पक्षबदल केला आहे. त्यामुळे मुळातच पक्षाला गळती लागलेली आहे. त्यातच अंतर्गत संघर्षामुळे बरीचशी फुटही पडली आहे. यावेळी शहापूरमध्ये राष्ट्रवादीचाच आमदार निवडून आणा’ असे आवाहन अजित पवार यांनी केले. या वेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक, माजी आमदार गोटीराम पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव, आमदार आनंद ठाकूर आदी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*