राज्यातील 5 जिल्हा परिषद बरखास्त

मुंबई :

नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदा बरखास्त करण्यात आलेल्या आहेत. या पाचही जिल्हा परिषदांचा कार्यकाळ संपला होता तरीही त्या जिल्हा परिषदा कार्यरत होत्या. त्यामुळे त्यांचा थेट सुप्रीम कोर्टातुन निकाल लागला. यानंतर ग्रामविकास खात्याने गुरुवारी यासंदर्भातले आदेश दिले. या निकालानंतर मात्र तातडीने या 5 जिल्हा परिषदा बरखास्त करण्यात आल्या आहेत.

नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2017 मध्ये संपला होता तर उरलेल्या इतर 4 जिल्हा परिषदांचा कार्यकाळ डिसेंबर 2018 मध्ये संपला होता. या ठिकाणच्या आरक्षण प्रक्रियेसंदर्भात उच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया लांबली होती.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*