मराठवाड्यात लगेच पाऊस न पडल्यास दुष्काळ अटळ

औरंगाबाद :

मराठवाड्यात केवळ 16 टक्केच पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरी लक्षात घेता हा पाऊस अत्यंत कमी असुन दुष्काळ अटळ असण्याचे चिन्ह दिसत आहे. 15 जुलैपर्यंत किमान 49 टक्के पाऊस पडणे अपेक्षित होते. पहिल्या पावसाच्या आधारावर काही लोकांनी पेरण्या केल्या आहेत. परंतू पावसाने फक्त एकदाच हजेरी लावली. त्यानंतर आता पाऊस तोंड दाखवायला देखील तयार नाही. त्यामुळे पाऊस जर झाला नाही तर पिकांची अवस्था वाईट होईल. आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. त्यामुळे शेतकरी राजा आता पाऊस होऊनही संकटात सापडला पडला आहे.
संपूर्ण मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ 53 टक्केच पाऊस झाला. मराठवाड्यात एकूण लागवड क्षेत्र जवळजवळ 50 लाख हेक्टर आहे. पण त्यापैकी 24.31 लाख हेक्टर. म्हणजे 48.66 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासुन सातत्याने असेच घडत आहे. एकच पाऊस मोठा होता. शेतकरी पेरणी करतात आणि पुन्हा पाऊस न झाल्याने पिकांचा नुकसान होते. वेळोवेळी पाऊस हुलकावणी देतो आहे. हि हुलकावणी बळीराजाच्या गळ्याचा फास दिवसेंदिवस आवळत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*