ठाकरे पंतप्रधान झालेलेही मला आवडेल : सावंत

पुणे :
सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेले भाजप शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी पुढे सरसावले आहेत. शिवसेना नेते हे मुख्यमंत्री पदाची इच्छा नेहमीच बाळगुन आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे त्यांना विधानसभा विजयाचीही खात्री आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि जलसंपदामंत्री तानाजी सावंत यांनी मंत्री पदावरून भाजपवर टीका करत सत्तेचा माज उतरवण्याची धमकीही दिली.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच नव्हे पंतप्रधान झालेलं ही मला आवडेल अशी आकांक्षाही बोलून दाखवली. सावंत यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान पुढे बोलताना ‘एकला चलो रे अथवा युती ठेवायची की नाही हा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील’.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*