आमदार वैभव पिचड यांचा पक्षबदल होणार..?

अहमदनगर :

अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड यांच्याकडून पक्षबदल केला जाण्याची चर्चा सध्या जोरात आहे. मात्र, त्यांनी अजूनही त्यास दुजोरा दिलेला नाही.

अवघ्या महाराष्ट्रात पक्षबदलाचे वारे सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने हे पक्ष बदल होत आहेत. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष अशा राज्य स्तरावरील नेते पक्षबदल करीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड यांच्या पक्ष बदलाची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. गेल्या महिनाभरापासुन ते मुंबईत आहेत. तब्बल सव्वा महिना मुंबईत घालवल्यानंतर ते अकोल्यात आले. पिचड भाजपवासी होणार की शिवसेनेत जाणार याकडे तालुक्यातील पिचड समर्थकांसह सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी वैभव पिचड यांनी सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट घेतली. तर बुधवारी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*