भाजपची ‘महाभरती’ जोमात; विरोधक कोमात

मुंबई :

भाजपमधे ‘प्रवेश पे प्रवेश’ चालूच आहेत. विरोधीपक्षाचे अगदी मोठमोठे पदाधिकारी भाजपमधे प्रवेश करत आहेत. ज्यांना विविध कारणांमुळे भाजपप्रवेश करणं अशक्य आहे ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठे खिंडार पडले आहे. अजुनही राष्ट्रवादीचे 7-8 आमदार भाजपमधे प्रवेश करतील असे चित्र आहे.
मुंबईतील वानखेडे मैदानावरील गरवारे पॅव्हेलियनमध्ये आमदार आणि नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे. नेमकं कोण कोण भाजपमध्ये दाखल होईल, हे स्पष्ट करण्यात आलं नाही. मात्र, चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर, मधुकर पिचड, वैभव पिचड, नवी मुंबईतील नाईक कुटुंब इत्यादी नेते मंडळी भाजपच्या गोटात दाखल होतील अशी चर्चा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*