अंगणवाडी सेविकांचा जेलभरो

अहमदनगर :

अंगणवाडी महिला कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी क्रांतिदिनी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कॉ.राजेंद्र बावके, शरद संसारे, जीवन सुरडे, मदिना शेख, मन्नाबी शेख, नंदा पाचपुते, सविता दरंदले, रागिनी जाधव, मायाताई जाजू, संजीवनी आमले, इंदुबाई दुशिंग, अलका दरंदले, मीना कुटे, संगीता इंगळे, अलका नांगरे, वंदना गमे, शोभा लांडगे, संगीता विश्‍वास, भगीरथी पवार, रतन गोरे, मंदाकिनी दळवी, सुवर्णा गायकवाड आदिंसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांना पोलिसांनी अटक करून लेखी हमीवर सोडून दिले.

शुक्रवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालया समोर अंगणवाडी सेविका जमण्यास सुरु झाल्या. मोठ्या संख्येने येत असलेल्या अंगणवाडी सेविकांना पोलीस प्रशासनाने भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या मैदानात आंदोलन करण्यास भाग पाडले. मात्र आंदोलकांनी येथील गैरसोयीचा तीव्र निषेध व्यक्त केला. अंगणवाडी सेविकांनी प्रलंबीत मागण्यांसाठी केलेल्या जोरदार निदर्शनाने संपुर्ण परिसर दणाणून निघाला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनाची वाहने देखील कमी पडले. उर्वरीत आंदोलक महिलांनी आंदोलन स्थळी ठिय्या मांडला होता. महिलांना अटक करुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये नेऊन काही वेळाने सोडून देण्यात आले. अत्यल्प मानधन व ते देखील थकित असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कठिण झाले असताना जेलमध्ये दोनवेळच्या जेवणाची सोय करण्याची संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*