पूरग्रस्तांच्या तांदळावर फडणवीस व हाळवणकरांचे स्टिकर..!

पुणे :

कुठे, कधी, कसे, केंव्हा आणि काय पध्दतीने राजकारण करावे याचे नवे नियम नव्या भारतात लागू झाले आहेत. त्याचाच प्रत्यय मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही देत आहेत. पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या गहू-तांदुळ यांच्या पिशव्यांचाही राजकीय प्रचारासाठी उपयोग करण्याची ‘सुसंधी’ साधली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर, सांगली व सातारा येथील कऱ्हाड भागात महापुराने कहर केला आहे. सुमारे साडेतीन लाख नागरिकांना याचा फटका बसला आहे. अशावेळी सलग 2 दिवस पुरात अडकून पडलेल्या नागरिकांना सरकारी खर्चाने गहू व तांदूळ देण्यात येत आहे. तसेच खाण्याची पाकिटे व पिण्याचे पाणी लष्करी हेलिकॉप्टरमधून टाकले जात आहे. सामाजिक संघटना तत्परतेने मदत करीत आहेत. तर, काहींनी याचाही राजकीय लाभ उठविण्याची संधी साधली आहे.

इचलकरंजी येथील भाजप आमदार सुरेश हाळवणकर हेही यात आघाडीवर आहेत. त्यांनी तांदूळ व अन्नधान्याच्या पिशव्या बांधून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह आपला व प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठीचे स्टिकर लावण्यात आले आहे. सोशल मीडियावर यामुळे संताप व्यक्त होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*