म्हणून वंचित आघाडीच्या मुलाखती लांबणीवर..!

अहमदनगर :

कोल्हापूर, सांगली, सातार्‍यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तेथील जनता प्रचंड संकटात आहे. अशा वेळी वंचित बहुजन आघाडीने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या (दि. 13) नगर व सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार नाहीत. या मुलाखतींची तारीख नंतर कळविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे व महासचिव दिलीप साळवे यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर व सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी घेतल्या जाणार होत्या; परंतु पूरग्रस्तांना वंचित आघाडीच्या वतीने मदत करण्यात येणार आहे. ही मदत घेऊन नेते कोल्हापूर, सांगलीला जाणार आहेत. वंचित आघाडीच्या नेत्या, कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांसाठी भरीव मदत करावी, असे आवाहन वंचित आघाडीचे नेते, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*