मेघा देशमुख यांना कृषी पुरस्कार जाहीर

परभणी :

तालूक्यातील झरी येथल्या आदर्श महिला शेतकरी श्रीमती मेघा विलासराव देशमुख यांना पुषद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा वसंतराव नाईक स्मृती कृषी पुरस्कार २०१९ नुकताच जाहीर झाला आहे. अशी माहीती वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषीभूषण दिपक आसेगावकर यासह कृषी भुषण कांतराव देशमुख झरीकर यांनी दिली आहे.

मेघा देशमुख यांनी आपल्या शेतीत अथक परिश्रमातून पेरु फळाचे विक्रमी उत्पादन घेत ईतर शेतक-यापुढे आदर्श निर्माण केल्यामुळे त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कै. वसंतराव नाईक यांचा ४० वा स्मृती दिन सोहळा रविवार दि १८ आॅगस्ट २०१९ रोजी दु १२ वाजून १५ मिनिटांनी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात (पुसद) संपन्न होणार आहे. या ठिकाणी पुरस्कार वितरण आणि सत्कार करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ. चारुदत्त माई (अध्यक्ष, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र दिल्ली) तथा माजी कुलगुरु वनामकृवि परभणी हे तर, प्रमूख पाहूणे म्हणून डॉ. आशिष पातूरकर (कुलगुरु महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर) हे उपस्थित राहणार आहेत. निवडीमुळे मेघाताई देशमुख झरीकर यांचे सर्वत्र कृषी जगतातून अभिनंदन होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*