थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंचा जनसंपर्क..!

अहमदनगर :

राजकारण करताना आपले स्थान पक्के करतानाच दुसऱ्यांच्या स्थानाला धक्का देण्याची कार्यवाही करावी लागते. त्याच धड्याला साक्षी ठेऊन भाजपचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरात जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर दक्षिणेकडे विजयी घोडदौड सुरू केल्यानंतर आता आपला मोर्चा संगमनेर या थोरातांच्या बालेकिल्ल्याकडे वळविला आहे. त्यांनी प्रचाराला सुरुवात करतानाच आता वडील राधाकृष्ण विखे यांनीही थोरात यांना संगमनेर तालुक्यात अडकवून ठेवण्यासाठीचा विचार करीत जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्याचा फायदा भाजपाला होणार की काँग्रेसच्या थोरात यांना हे विधानसभा निवडणुकीत निकालानंतर स्पष्ट होईल.

मात्र, संगमनेर विधानसभा जागा युतीच्या मैत्रीत शिवसेना पक्षाकडे असताना भाजपाच्या विखे यांनी त्यावर दावा कसा केला, याचे कोडे अजूनही संगमनेरकरांना उमगले नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*