आठवलेंकडून पूरग्रस्त कोल्हापूर-सांगलीला मदत

कोल्हापूर :
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठिशी आहे. शासनाकडून मदत मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. माझ्या खासदार फंडातून सांगलीसाठी 25 लाख आणि कोल्हापूरसाठी 25 लाख रुपयांची मदत मी जाहिर करतो, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

श्री. आठवले यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते. श्री. आठवले म्हणाले, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली गावच्या संरपंचांशी आज चर्चा केली. पुराचा सामना करण्यासाठी सुरक्षितस्थळी घरे बांधता येतील असा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचविलेला नदी जोड प्रकल्प गेल्या 60-65 वर्षात राबवला असता तर अशी वेळ आली नसती. पूरग्रस्तांना सोयी मिळत असल्याची माहिती आज दौऱ्यादरम्यान पूरग्रस्तांनकडून मिळाली. प्रशासनाच्या सोबत कोल्हापूरकर मदत कार्यात अग्रेसर आहेत त्यांचे धन्यवाद. पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थ मंत्र्यांकडे मागणी करणार आहे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना नुकसान भरपरई मिळावी त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. यावेळी शहाजी कांबळे, उत्तम कांबळे आदी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*