शिक्षकांचे अनुदानासाठी आंदोलन

अहमदनगर :

विना अनुदानित उच्च महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्यावे, प्राध्यापकांना पगार सुरू करावा या प्रमुख मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.15) रोजी प्राध्यापक कुंटुंबासह जिल्हा परिषदेच्या माध्यमिक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहे. दरम्यान प्राध्याकांनी शिक्षणाधिकारी यांच्या दालनात मंगळवारी दि. 13 ऑगस्ट रोजी ठिय्या आदंोलन केले.

दरम्यान प्राध्यापकांनी शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात सचिन पालवे, देविदास हारवणे, सुभाष चिंधे, नानासाहेब बांदल, संजय शेवाळे, गणेश पुंड, ज्ञानेश्‍चर बर्डे, शेखर अंधारे, ऋषीकेश माताडे, बाळासाहेब गुंजाळ, दिपक बोरुडे, अभिमन्यू गायकवाड, दत्तात्रय गडघारे, अदिनाथ विटनोर, शिवाजी विटनोर, अशोक कुदतर, सुभाष गटकळ, रमेश परभणे, नितिन काळे, दत्तात्रय काकडे, श्रीकांत जाधव, प्रमोद घोडेस्वार, रमेश चोपडा,  उमादेवी शेळके, कल्पना फुलसौंदर, शोभा वायकर, सुवर्णा राहिंज, विजया संसारे, सोनाली पाटोळे, विद्या कदम, अश्‍विनी डावरे, पुनम धुमाळ, आशा भिसे, योगिता सांगळे, सोनाली पाटोळे, सुवर्णा तोडमल, अनिता गोसावी,  आसावरी खोपे, सादिया भालेराव, शीतल कोतकर, मनिषा ठोंबरे, राजश्री चव्हाण, एम. गोर्डे, एस. मचे, पी. पाटील, एन. खान, वाय. कोकरे, डी. करंडे, प्रणाली नगरकर, रेखा खैरनार, मनिषा ठोंबरे, सोनाली गरुड यांच्यासह नगर शहर, अकोले, श्रीरामपूर, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, राहुरी, संगमनेर, नेवासा तालुक्यातील प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

गेल्या वीस वर्षापासून या शिक्षकांना कोणत्याही पद्धतीचा अनुदान शासनाच्या वतीने देण्यात आले नाही. वारंवार शिक्षणाधिकारी व शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. शिक्षण अधिकारी यांच्या दालनांमध्ये शिक्षकांनी ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दि. 15 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्मदहन  जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयासमोर सर्व शिक्षक सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे निवेदन शिक्षण विभागाला दिले. शासन विनाअनुदानित प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत वेळकाढूपणा करत असल्याच्या निषेधार्थ क्रांतीदिनापासून विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. राज्यातील विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गत पंधरा वर्षांपासून विनाअनुदानित विनावेतन काम करत आहेत. 2014 पासून विनाअनुदानित शाळा व तुकड्यांचे मूल्यांकन करुन मूल्यांकनास पात्र वर्ग, तुकड्या अनुदानास पात्र घोषित न केल्यामुळे या सर्व शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सातत्याने अन्याय होत असल्याची भावना या शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. न्याय व सदनदशीर मागण्या मान्य होण्याकरिता वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गत चार वर्षांपासून प्राध्यापकांच्या तोंडाला पाने पुसली. शासनाला जागे करण्यासाठी व प्राध्यापकांच्या मागण्या मान्य होण्यासाठी स्वातंत्रदिनी दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण कार्यालयासमारे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*