पूरग्रस्तांना रॉकी डॉगचीही मदत

कोल्हापूर :

बॉम्ब शोधक व नाशक पथकातील रॉकी हा डॉगदेखील आपली सेवा विमानतळावर बजावत आहे. हेलिकॉप्टरमध्ये कोणतेही साहित्य पोहचविण्यापूर्वी  तसेच ठेवल्यानंतरही तो तपासतो. आजही त्याने एमआय 17 मध्ये आपली सेवा बजावली. गेल्या 3 दिवसांपासून तो विमानतळावर सेवा देत आहे.

शहरातील महालक्ष्मी मंदिर,विमानतळ ही ठिकाणे रॉकीकडून दररोज तपासली जातात. तसेच रेल्वे स्टेशन, मॉल अशा  गर्दीच्या ठिकाणीही तो आपली सेवा बजावत असतो. गेल्या  7 वर्षापासून रॉकी पथकात असून त्यासाठी सहाय्यक उपनिरीक्षक राजन कांबळे हे हॅंडलर म्हणून काम पाहतात. कागल येथे झालेल्या स्फोटाच्या तपासात रॉकीने मदत केली आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विकास टेके यांनी दिली.

शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी आज दिवसभरात एकूण 6 फेऱ्यांच्या माध्यमातून 12 टन 300 किलो अन्न व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आला. दिनांक 10 ऑगस्ट रोजी 4 टन 800 किलो, दिनांक 11 ऑगस्ट रोजी 7 टन 808 किलो ग्रॅम, दिनांक 12 ऑगस्ट रोजी 13 टन 690 किलो ग्रॅम असा एकूण 38 टन 598 किलो ग्रॅम वस्तुंचा पुरवठा करण्यात आला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*