समृद्धी महामार्गावर दहा कौशल्य विकास केंद्र

मुंबई :

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर बांधकाम क्षेत्राशी संबंधित दहा कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहे. या माध्यमातून तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज येथे दिली.

भारतीय उद्योजक महासंघाच्या (सीआयआय) च्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्री. पाटील-निलंगेकर बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाने उभारलेल्या पायाभूत सुविधांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यासाठी विविध उपक्रमावर भर दिला आहे. कौशल्य विकास विभागाच्या सर्व योजनांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्योगांना आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी लागणारे अभ्यासक्रम उद्योगांनीच तयार करून घ्यावे, अशी सूचना आम्ही केली आहे. अशा अभ्यासक्रमाना पंधरा दिवसात मान्यता देण्यात येईल. तसेच उद्योगासाठी आवश्यक प्रशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये प्रशिक्षणासाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.

 आयटीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. त्यामुळे त्यावर भर देण्यात येत आहे. तसेच राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच राज्यातील विविध विभागात एकूण सहा कौशल्य विकास विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

केंद्रीय मंत्री श्री. पांडे म्हणाले, कुशल भारतच्या माध्यमातून केंद्र शासन कौशल्यपूर्ण युवकांची फळी तयार करत आहे. त्यासाठी उद्योजकांना मोठ्या सुविधाही देण्यात येत आहेत. तसेच ॲप्रेंटिस कायद्यामध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. सिंगापूरमधील ॲप्रेटिंसचा पॅटर्न देशातही राबविण्यात येणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*