इलायची खा, तब्बेतीत राहा..!

मसाल्याच्या सर्व पदार्थामधील सर्बाधिक महागडा आणि तरीही रोजच्या वापरातला पदार्थ म्हणजे हिरवी इलायची अर्थात वेलदोडा. या इलायाचीचे आरोग्यदायी गुणधर्म आणि सुगंध व सुमधुर अशी चव अनेकांना माहित असेलच. तरीही त्याबद्दल थोडक्यात माहिती देत आहोत. वाचकांच्या आग्रहास्तव…

चहा, रबडी, शिरा असोत की पुलाव किंवा बिर्याणी. त्यातील इलायची खायला आपल्याला नक्कीच आवडते. याच इलायाचीला आयुर्वेदात खूप महत्व आहे. अनेक औषधांच्या मिश्रणात इलायाचीचा वापर केला जातो.

तसेच सर्दी-पडसे अशा किरकोळ आजारांसह पोटातील चरबी कमी करून वजन घटविण्यासाठीही वेलदोडा महत्वाचा आहे. चयापचय क्रिया सुधारण्यासह कोलेस्टेरोलचा स्तर घटवून ग्लुकोज टॉलरन्सच्या पातळीमध्ये सुधार करण्यासही याचे सहाय्य होते.

रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यासह शहरातील आम्ल नियंत्रणात ठेऊन पित्तालाही अटकाव करण्यासाठी इलायची खाणे उपयोगी ठरते.

तोंडाची दुर्घंधी घालविण्यासाठी आणि तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर राहण्यासाठी वेलदोडा मदत करतो. लघवीची क्रियाही याच्या सेवनामुळे सुधारते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*