‘विकास’ला लागले काटे, भाजपचे बियाणे खोटे : राष्ट्रवादी कॉंग्रेस

पुणे :

देशभरात सध्या बेरोजगारीचा दर वाढत आहे. आतापर्यंत रोजगाराची टक्केवारी मंदावली होती. मात्र, ती प्रथमच उणे झाली आहे. देशभरात सुमारे दीड कोटी लोकांचे रोजगार गेल्याचे विविध अहवाल सांगतात. अशावेळी महाराष्ट्रातही परिस्थिती वाईट आहे. त्यावर राष्ट्रवादीने ‘भाजपच्या ‘विकास’ला लागले काटे’ अशा अर्थाचे कार्टून प्रसिद्ध केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर खात्यावर हे कार्टून आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकास’ नावाच्या बियाण्याची पिशवी शेतकऱ्यांना दिलेली आहे. मात्र, त्यातून निवडुंग उगवून शेतकऱ्यांना काटे टोचत असल्याचे दाखविले आहे. हे कार्टून सध्या सोशल मीडियामध्ये जोरात फिरवले जात आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*