दुष्काळ निवारणासाठी मराठवाडा वॉटरग्रीड

मुंबई :

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची दुष्काळ निवारणासाठी मराठवाडा वॉटरग्रीड या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रक्षेपित होणार आहे.

            मराठवाड्यातील पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना,शासनाचा मराठवाडा वॉटर ग्रीड हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये अंतर्भूत बाबी, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाची वॉटर ग्रीडसाठी मदत, वॉटरग्रीडसाठी जलशुध्दीकरण केंद्र,जलसंपत्तीनियम प्राधिकरणाची वॉटर ग्रीड उभारणी व नियमावलीमध्ये असलेली भूमिका, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची राज्यातील अंमलबजावणी आदी विषयांची माहिती श्री. लोणीकर  यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*