विमानाने गेले, तरीही बंडाळीचे कारण ठरले..!

अहमदनगर :

सगळी राजकीय व वैचारिक गणितं बाजूला सारून सध्या विधानसभा निवडणुकीचे गणित जुळविण्यासाठी भाजप व शिवसेना आक्रमक झाली आहे. साताऱ्यात यामुळे भाजपच्या अंतर्गत खदखद व्यक्त होत असतानाच त्याचे लोन नगरमधील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात पोहचले आहे. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी कॉंग्रेसला सोडून देत शिवधनुष्य हाती घेण्याचे ठरविले आहे. मात्र, स्थानिक शिवसैनिकांनी याविरोधात बंडाचा झेंडा फडकाविला आहे. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या राखीव मतदारसंघात सेनेकडून लहू कानडे इच्छुक होते. तर, भाजपकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह नितीन दिनकर व माजी प्रशासकीय अधिकारी नितीन उदमले यांनी लढण्यासाठीची तयारी केली होती. मात्र, महायुती अभेद्य राहणार असल्याने श्रीरामपूरची जागा आता सेनेकडे राहणार आहे. त्यासाठी सेनेने आमदार कांबळे यांना आयात करून उमेदवारी देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कांबळे यांना खास विमानाने बोलावून घेऊन आपलेसे केले, अशी चर्चा आहे. कांबळे यांनी आमदारकीचा राजीनामाही दिला आहे. मात्र, आता हेच कांबळे यांच्यामुळे स्थानिक शिवसैनिक खट्टू झाले आहेत. ते कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*