‘अशोक लेलंड’लाही मंदीचा झटका; ५ ते १८ दिवसांचा ‘काम बंद’

मुंबई :

देशात आर्थिक मंदी येणार किंवा नाही, यावरून सोशल मिडीयावर व राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सर्वसामान्यांचा त्यामुळे गोंधळ उडाला आहे. मात्र, आता टाटा कंपनीनंतर मालवाहतुकीसाठीच्या गाड्या उत्पादन करणाऱ्या अशोक लेलंड कंपनीनेही किमान ५ ते कमाल १८ दिवसांचा ‘काम बंद’ अधिकृतरीत्या जाहीर केला आहे. त्यामुळे उद्योग जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे ७० टक्के विक्री कमी झाल्याचा फटका बसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. सध्या ट्विटर आणि इतर सोशल मिडीया वेबसाईट यावर कंपनी ट्रेंडमध्ये आहे. यावरून सरकारची बाजू घेणारे व विरोधक यांच्यात घमासान सुरू आहे. इंग्रजी व हिंदी न्यूजपेपर आणि वृत्तवाहिन्या यांनी त्यावर बातम्याही सुरू केल्या आहेत.

मागणी कमी झाल्याने बनविलेली उत्पादने व ट्रक तशाच पडून असल्याने सप्टेंबर महिन्यात एकूण दिवसातील काही दिवस काम बंद ठेवण्याचे पत्र मुंबई शेअर बाजारात येऊन धडकल्याने खळबळ उडाली आहे. सरकारकडून मंदी नसल्याचे सांगण्यात येत असतानाच अशा घटना घडत असल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*