घरकुल वंचितांचा आक्रोश

अहमदनगर :

महापालिकेने घरकुल वंचितांसाठी उभारलेल्या प्रकल्पात घरे परवडणार्‍या किंमतीत नसल्याने अनेक घरकुल वंचितांनी या घरांकडे पाठ फिरवली आहे. घरकुल वंचितांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत परवडणार्‍या किंमतीत घरे मिळण्यासाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आक्रोश करुन शेल्टर डायनामिक्स 50-50 योजनेचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर या प्रस्तावाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरण्यात आला. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, बन्सी सुळाखे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, किशोर मुळे, पोपट भोसले, गोपीनाथ जयराम, सोमनाथ अडागळे, दिलीप जाधव, शांता ठुबे, हिराबाई ग्यानप्पा, अंबिका नागुल, शारदा गायकवाड, मुजावर बेगम, जयश्री भुजबळ, शबाना शेख, आशा बारस्कर, सुमन जोमदे, लता शेलार, फरिदा शेख, अंबिका जाधव, लतिका पाडळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेल्टर डायनामिक्स 50-50 योजनेद्वारे सरकारी जमीनीशिवाय आणि सरकारी बांधकाम खर्चाशिवाय मध्यमगती शहरांमध्ये घरकुल वंचितांना परवडणार्‍या किंमतीत घरे उपलब्ध होणार असल्याचा दावा संघटनेने केला आहे. भारताचे परिवहन मंत्री यांनी सरकारी तिजोरीवर बोजा न टाकता बीओटी तत्वार हजारो कि.मी. चे रस्ते बांधून महाराष्ट्राच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला. यासाठी संघटनेच्या वतीने गडकरी यांना इंडियन लॉरिस्टर ऑफ हाय ब्रेन मिसाईलची मानवंदना यावेळी देण्यात आली.

जगभरातील अनेक देशांनी गाईडेड लॅण्ड डेव्हलपमेंट म्हणजेच हायब्रिड लॅण्ड पुलिंग तंत्राचा वापर करुन घरकुल वंचितांना प्रश्‍न सोडविला आहे. मात्र सरकारी नोकरशाहीच्या अकार्यक्षमतेमुळे देशातील घरकुल वंचितांचा प्रश्‍न सुटताना दिसत नाही. केंद्र व राज्यसरकारकडून घरकुल वंचितांना अडीच लाख रुपयाचे अनुदान दिले जाते. तेवढीच रक्कम घरकुल वंचित बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करु शकतात. लॅण्ड पुलिंग योजनेद्वारे शहरा शेजारील खडकाळ जमीनींवर मुळ शेतकर्‍यांना मोठा मोबदला देऊन, घरकुल वंचितांना परवडणार्‍या किंमतीत घरे मिळणार आहेत. शेतजमीन मालकांना जमीनीच्या मोबदल्यात विकसीत जमीनीचा 50 टक्के भाग मिळणार आहे. घरांचा प्रश्‍न सुटल्यास अनेक घरकुल वंचित दारिद्रय रेषेच्या वर येणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले. सामाजिक व आर्थिक विषमतेमुळे अनेक घरकुल वंचित झोपड्या व गटारीच्या कडेला राहत आहेत. शेल्टर डायनॅमिक्स 50-50 योजनेमुळे देशात क्रांती होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*