‘कडकनाथ’वाल्यांची वज्रमूठ; १६ सप्टेंबरला मोर्चा

कोल्हापूर :

‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक संदीप सुभाष मोहिते (दोघे रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यासह हनुमंत शंकर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर कारवाई करून फसवणूक झालेले पैसे मिळण्यासाठी आता कुक्कुटपालन करणारे शेतकरी एकवटले आहेत. दि. १६ सप्टेंबरला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकरी संघटनेच्या वतीने पुढाकार घेऊन फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची एक कमिटी स्थापन करण्यात आळी आहे. त्याबाबत माहिती देताना आंदोलनाचे समन्वयक धनाजी गुरव म्हणाले की, कंपनीने हजारो शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीही पोलीस घेत नसल्याची शेकडो उदाहरणे आहेत. त्यामुळेच एकीची वज्रमूठ आवळून शेतकरी एक झालेले आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी याप्रकरणी ईडीने तपास करण्याची मागणी केली आहे. मात्र, तरीही राज्य सरकारने याबाबत अजूनही अधिकृत घोषणा किंवा माहिती दिलेली नाही. स्थानिक पोलीस या प्रकरणी योग्य तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन देत आहेत. तर, मंत्री सदाभाऊ खोत व शेट्टी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकूणच याप्रकरणी शेतकरी न्याय मिळणार की नाही, याच संभ्रमात आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*