महिला बचत गटांना २०० कोटी खेळते भांडवल

मुंबई :
राज्य शासनाने महिला बचत गटांना २०० कोटी रुपयांचे खेळते भांडवल दिले आहे. यामुळे बचत गटांमार्फत स्वयंरोजगारासाठी सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना मोठ्याप्रमाणावर सहाय्य झाले आहे.

या बचत गटांच्या मार्फत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी राज्यात गेल्या पाच वर्षात विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून बचत गटातील १ लाख १४ हजार महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षणही देण्यात आले.

बचत गटाच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आल्याने २०१४ नंतर ३ लाख ९७ हजार १३७ बचतगटांची निर्मिती झाली. यातील लाभार्थी कुटुंबांची संख्या ३२ लाख ८६ हजार १४६ इतकी आहे. याच कालावधीत २६ हजार ४६५ समूह गट आणि ६८८८ ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*