काँग्रेस-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला; 38 जागा मित्रपक्षांना..!

मुंबई :

सत्ताधारी महायुतीच्या गोटात अजूनही चर्चेला मुहूर्त मिळत नसतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जागावाटपाची अधिकृत आकडेवारी जाहीर करून टाकली आहे. त्यात आघाडीच्या या दोन्ही घटक पक्षांनी प्रत्येकी 125 जागा घेऊन 250 जागांची बेरीज पूर्ण केली आहे.

तसेच उरलेल्या 38 जागा उरलेल्या मित्रपक्षांना देण्याची तयारी असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. ते म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असलेल्या इतरही पक्षांना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आम्ही जागा देत आहोत. इतर पक्षांनी चर्चा करून येण्याची तयारी दाखविल्यास 125:125 हा फॉर्म्युला बदलू शकतो. जागा कमी झाल्या तरी चालतील. पण धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष एकत्रित येऊन लढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*