अशा पद्धतीने नागरिकही करू शकतील आचारसंहिता भंगाची तक्रार

मुंबई :
निवडणूक आचारसंहिता भंग होत असताना तक्रार करण्यासाठी पुढे येणाऱ्या नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने मोबाईल अप्लिकेशन व टोल फ्री नंबरवर थेट तक्रार देण्याची सोया खुली केली आहे.

सी-व्हिजिल व हेल्पलाईन

निवडणुकीत सी व्हिजिल, सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास सी व्हिजिल या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आले असून तक्रार निवारणासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्यस्तरावर 24 तास ही सेवा सुरू राहणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*