कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर यंदा भाजपचे कडवे आव्हान

सातारा :
कराड शहर म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे गाव. त्यामुळेच राज्यात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक महत्वाचे व सजग मतदारांचे शहर व तालुका म्हणून कार्डाची ओळख आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर भाजपने कडवे आव्हान उभे करण्यात यश मिळविले आहे.

माजी आमदार विलासकाका उंडाळकर-पाटील यांना डावलून मागील निवडणुकीत या जागेवर चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी झालेल्या तिरंगी निवडणुकीत चव्हाण यांचा विजय झाला. मात्र, यंदा काँग्रेस सत्तेत नसल्याने येथील कार्यकर्ते सैरभैर होऊन भाजपाकडे जात आहेत. त्यामुळे येथून भाजपचे इच्छुक असलेल्या अतुल भोसले यांची ताकद वाढत आहे.

भोसले म्हणजे सीएम कॅन्डीडेट
२०१४ च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळी 76 हजार 831 मतं मिळाली होती. अपक्ष विलासकाकांना 60 हजार ४१३ मतदान मिळून ते दुसऱ्या स्थानावर होते. तर, भाजपचे अतुल भोसले यांनी तब्बल 58 हजार ६२१मतदान झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसले यांना राजकीय ताकद देत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुंदीनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षपद दिले. तसेच मोठा विकासनिधी देऊन चव्हण यांना काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे.

यंदा उंडाळकर गटाकडे असेल लक्ष
काँग्रेस पक्ष यंदा पुन्हा एकदा चव्हाण यांनाच उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत. तर, उंडाळकर गट पुन्हा अपक्ष लढण्याची तयारी करीत आहे. अशावेळी याच फायदा भाजप उमेदवार अतुल भोसले यांना होण्याची शक्यता येथील राजकीय धुरीण व्यक्त करीत आहेत. मात्र, काँग्रेस यंदा पुन्हा एकदा येथून विजय खेचून आणण्याच्या निर्धाराने निवडणूक लढविणार असल्याचे संकेत प्रदेश काँग्रेसने दिलेले आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*